Domicile Certificate|डोमिसाईल सर्टिफिकेट
मित्रांनो आज आपण डोमासाईल सर्टिफिकेट याबद्दल माहिती पाहणार आहोत एखादा नागरिक ज्या राज्याचा रहिवासी आहे किंवा ज्या गावचा रहिवासी आहे त्याबद्दल ज्या सर्टिफिकेटमध्ये सांगितले जाते त्यालाच आपण डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र असे म्हणतो.
डोमीसाईल सर्टिफिकेट हे नागरिकांच्या भारतातील राज्याचा किंवा केंद्र प्रदेशातील निवासी स्थान दर्शवितो
डोमिसाईल सर्टिफिकेट हे स्थानिक रहिवासी पुरावा म्हणून मागवले जाते विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी तसेच नागरिकांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या विविध शासकीय योजनेमध्ये स्थानिक रहिवासी पुरावा म्हणून नागरिकांसाठी डोमिसिअल सर्टिफिकेट मागवली जाते, तसेच शासकीय नोकरीमध्ये सुद्धा स्थानिक रहिवाशी किंवा गेल्या पंधरा वर्षापासून नागरिक ज्या राज्याचे रहिवासी आहेत याचा पुरावा म्हणून डोमिसाइल सर्टिफिकेट मागवले जाते.
डोमिसाईल सर्टिफिकेट मध्ये ज्या उमेदवाराचे डोमिसाईल सर्टिफिकेट काढायचे आहे त्यांची जन्मतारीख त्यांचे वय, राज्य, जिल्हा व तालुका यांचा समावेश असतो डोमिसाईल सर्टिफिकेट हे एक वर्षासाठी वैद्य असते. डोमीसाईल सर्टिफिकेट हे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढताना आपल्याला स्थानिक पुरावा म्हणून सादर करावे लागते.
Domicile Certificate|डोमिसाईल सर्टिफिकेट उपयोग कोठे होतो
1) विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेत असताना डोमिसाईल सर्टिफिकेटची आवश्यकता असते.
2) विविध शासकीय योजनांमध्ये
नागरिकांना स्थानिक राज्याचा रहिवासी
म्हणजेच अधिवास पुरावा म्हणून डोमिसाईल सर्टिफिकेटच्या उपयोग होतो.
3) उमेदवारांना
शासकीय नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा
रहिवासी प्रमाणपत्र उपयोग होतो.