उत्पन्न दाखला काढण्यासाठी कागदपत्रे | INCOME CERTIFICATE MAHARASHTRA
उत्पन्न दाखला आपल्या कुटुंबात असणार्या सर्व व्यक्तींचे मिळून एका वर्षातील एकूण उत्पन्न दर्शविणारे प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्न दाखला Income Certificate होय
![]() |
उत्पन्न दाखला काढण्यासाठी कागदपत्रे | INCOME CERTIFICATE MAHARASHTRA |
उत्पन्न दाखला काढण्यासाठी कागदपत्रे | INCOME CERTIFICATE MAHARASHTRA
साधारणपणे एका आर्थिक वर्षात आपल्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळून येणारे उत्पन्न हे या प्रमाणपत्रामध्ये दर्शविले जाते. उत्पन्न प्रमाणपत्राचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते.
1) 1 वर्षाचा उत्पन्न दाखला
2) 3 वर्षाचा उत्पन्न दाखला
3) 21000 रूपयांचा उत्पन्न दाखला
उत्पन्न दाखला हा महसूल प्रशासनाकडून दिला जातो. त्यासाठी शासनाने नेमलेल्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज केले जातात. सर्व पुरावे व कागदपत्रे बरोबर असतील तर मा.तहसिलदार साहेब यांच्या सहिने अर्जदारास उत्पन्न दाखला प्राप्त होतो.
उत्पन्न दाखला उपयोग | Uses of Income Crtificate Of Maharashtra.
1) विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश मिळवण्यासाठी
2) नागरिकांना शासनाच्या आर्थिक उत्पन्नावर आधारित अशा विविध योजनांसाठी उत्पन्न दाखल्याचा उपयोग होतो.
3) विद्यार्थ्यांना आर्थिक उन्नत गटात न मोडणार्या प्रमाणपत्रासाठी म्हणजेच Non Crimeliyar certificate साठी उत्पन्न दाखल्याचा उपयोग होतो.
4) विद्यार्थांना शालेय शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उत्पन्न दाखल्याचा उपयोग होतो.
5) नागरिकांना आरोग्यविभागाकडून शासनामार्फत पुरविल्या जाणार्या विविध योजनामध्ये रुग्णांना आर्थिक सवलत मिळवण्यासाठी उत्पन्न दाखल्याचा उपयोग होतो.
उत्पन्न दाखला काढण्यासाठी कागदपत्रे | INCOME CERTIFICATE MAHARASHTRA
उत्पन्न दाखला काढण्यासाठी कागदपत्रे
1) ओळखीचा व पत्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड
2) स्थानिक रहिवाशी पुरावा म्हणून रेशन कार्ड
3) अर्जदारचा फोटो
4) उत्पन्न बाबत स्वयंम-घोषणापत्र .
5) अर्जदार जर नोकरी करीत असेल तर त्यांचे पगारपत्रक किंवा IT रिटर्न
या व्यतिरिक्त जर अर्जदाराला मागील तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र काढायचे असेल तर मागील तिन वर्षाचे उत्पन्नाबाबतचे स्वयंम-घोषणापत्र किंवा अर्जदार नोकरीस असेल तर मागील 3 वर्षाचे आयटी रिटर्न्स किंवा फॉर्म 16 हे सादर करावे लागते सादर करावे लागते.
21000/- रुपयांच्या उत्पन्न दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे
जर अर्जदारला अंत्योदय, श्रावणबाळ, निराधार, विधवा महिलांसाठी असणार्या योजनेसाठी उत्पन्न दाखला हवा असेल तर त्यासाठी 21000/- रूपयांचा उत्पन्न दाखला काढावा लागतो. त्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे.
1)आधार कार्ड
2) रेशन कार्ड
3) फोटो
4) बँक पास बुक
5) मंडल अधिकारी यांचा अहवाल
6) आपत्याबाबतचे स्वयं-घोषणापत्र
7) भूमिहीन स्वयं-घोषणापत्र
8) महिला अर्जदार जर विधवा असेल तर पतीचे मृत्यूप्रमाणपत्र
9) मतदान कार्ड.
वरील कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, मतदान कार्ड, फोटो ही कागदपत्रे सेतु केंद्रावर देऊन त्याची पावती घ्यावी लागते. त्यानंतर ही सर्व कागदपत्रे घेऊन मंडळअधिकार्यांना सादर केल्यानंतर फाइल योग्य असेल तर चौकशी व पंचनामा करून 21000/- रुपये प्रमाण पत्र देण्याबाबत मंडल अधिकारी अहवाल देतात तो अहवाल सेतु केंद्रावर जाऊन परत आपलोड करावा लागतो त्यानंतर 7 ते 8 दिवसात आपल्याला 2100 रुपयाचे प्रमाणपत्र मिळते.
वरील सर्व कागदपत्रे व शासनाने ठरवून दिलेले नियम व अटी अर्जदार पूर्ण करत असेल तर त्यांना 21000/- रुपये वार्षिक उत्पानाचा दाखला दिला जातो.
३ वर्षाचा उत्पन्न दाखला
३ वर्षाच्या उत्पन्न दाखला काढत असताना अर्जदारला मागील ३ वर्षाचे उत्पन्न सादर करावे लागते म्हणजेच त्याबद्दल स्वयंम घोषणा पत्र सादर करावे लागते अर्जदार जर नोकरीस असेल तर मागील ३ वर्षाचे पगारपत्रक किंवा मागील ३ वर्षाचे आयटी रिटर्न्स उत्पन्नाचा पुरावा म्हणून सादर करावे लागतात.
३ वर्षाचा उत्पन्न दाखला काढण्यासाठी कागदपत्रे | INCOME CERTIFICATE MAHARASHTRA
1) ओळखीचा व पत्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड
2) स्थानिक रहिवाशी पुरावा म्हणून रेशन कार्ड
3) अर्जदारचा फोटो
4) उत्पन्न बाबत स्वयंम-घोषणापत्र
5) अर्जदार जर नोकरी करीत असेल तर त्यांचे पगारपत्रक किंवा IT रिटर्न
वरील सर्व कागदपत्रे व शासनाने ठरवून दिलेले नियम व अटी अर्जदार पूर्ण करत असेल तर त्यांना 3 वर्षाचा उत्पानाचा दाखला अर्ज सादर केल्या पासून 15 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात दिला जातो दिला जातो.
Tags:
Certificate